शबनम न्यूज , प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते माजी महापौर आझम भाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत, आझम भाई पानसरे यांच्या या वाढदिवसानिमित्त आर्यन क्रिकेट क्लब चे अध्यक्ष करीम इनामदार यांच्या वतीने आकुर्डी येथील मदनलाल धिंग्रा मैदानात भव्य फुल पीच क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी युवा नेते निहाल पानसरे, माजी नगरसेवक निलेश पांढरकर अखिलेश सिंह गणेश भालेकर ,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा विभागाचे माजी अधिकारी रज्जाक भाई पानसरे, विजय बोराडे, प्रफुल्ल काळे पाटील ,अविनाश पाटील यांच्यासह शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख सरिता साने व सौ जिन्नत इनामदार,शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख मावळ शैला संजय पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.