शबनम न्यूज , प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे युवा मिशन 2024 राष्ट्रवादी युवक मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज बालेवाडी क्रीडा संकुल येथे भव्य राज्यस्तरीय युवक मेळावा संपन्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करताना युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होईल तसेच युवकांच्या राष्ट्रवादीची गरज अख्ख्या महाराष्ट्राला कशी आहे हे आपल्या शब्दातून सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे आदींचे मार्गदर्शन लाभले या युवक मेळाव्या आधी युवा नेते पार्थ पवार ,आमदार सुनील आण्णा शेळके ,युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दुचाकी रॅली काढून पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष शेखर काटे यांनी सर्व राष्ट्रवादीच्या युवकांना कार्यक्रम स्थळी रवाना केले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला यावेळी अभिवादन करून सदर दुचाकी रॅली ची सुरुवात करण्यात आली. या दुचाकी रॅलीत प्रचंड उत्साह दिसून येत होता. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस निर्णायक भूमिका बजावे असा विश्वास या मेळाव्यातून दिसून आला.