शबनम न्यूज , प्रतिनिधी : आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव, आळंदी या ठिकाणी विद्यार्थी कल्याण मंडळ आणि आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान अंतर्गत Menstrual Hygiene and Personality Developmentया विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनांनी झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राध्यापिका प्रेरणा पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश व भूमिका स्पष्ट केली कला शाखेतील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी जवेरीया खान हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सदर कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याता लर्निंग अँड डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट यांनी महिला सबलीकरणावर भाष्य करताना आधुनिक युग स्पर्धात्मक असून या युगात वावरताना महिलांनी स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे तसेच आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बुद्धिमत्ता व्यक्तिमत्व भाषा प्रभुत्व कार्य तत्परता व निर्णय क्षमता हे गुण जोपासण्याची आवश्यकता व्यक्त करून श्री पुरुष समानता हा धागा पकडून तन-मन-धनाने महिलांनी सुद्धा आपले अस्तित्व सिद्ध करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. महिलांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यानुसार आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे तसेच स्वच्छता आरोग्य व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कशी आवश्यकता आहे या संदर्भात विविध उदाहरणांचे दाखले देत विद्यार्थिनींना पीपीटीच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हंसराज थोरात यांनी स्त्री समानतेचा पुरस्कार महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शतकापूर्वीच केलेला असला तरी आजही स्त्रियांना समानतेची वागणूक दिली जात नाही त्यामुळे स्त्रियांनी स्वतः सबळ होऊन व आरोग्याची काळजी घेऊन शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या प्रबळ होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली महिलांवर कुटुंबाचीच नाही तर नवीन पिढी निर्माण करून घडविण्याची जबाबदारी आहे तसेच जगातील भ्रष्टाचार निर्मूलनाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर असून या संदर्भात त्यांनी वाल्या कोळीच्या बायकोच्या उदाहरणासह अनेक ऐतिहासिक व आधुनिक दाखले बहुमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर पांडुरंग मिसाळ ,प्राध्यापक संजीव कांबळे, डॉक्टर छाया जोशी, प्राध्यापक कैलास अस्तरकर, प्राध्यापक परमेश्वर भातशे , प्राध्यापिका शैला वाळुंज, प्राध्यापिका माधुरी चौधरी, प्राध्यापिका पूजा खवले ,प्राध्यापिका सविता मानके ,प्राध्यापिका माधुरी चौधरी, प्राध्यापक दिलीप बारी, प्रा. शाहूराज येवते ,प्राध्यापिका यशोदा आणेवार , प्राध्यापक विकास दिघे, प्राध्यापक रोहित कांबळे, प्राध्यापिका सुरेखा व्यवहारे, प्राध्यापिका दिपाली सोनवणे, डॉक्टर समीना मोमीन, प्रवीण भावे, सौ वर्षा ताजने, श्रीकांत कांबळे इत्यादी विभागप्रमुख सहाय्यक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका पूजा मिटकरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका यशोदा आणेवार यांनी मांडले या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धीप्रमुख प्राध्यापक माणिक कसाब यांनी दिली.