शबनम न्युज | मुंबई
काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला.
काँग्रेस मधील सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व अशोक चव्हाण यांनी स्वीकारले आहे. 12 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत कोणतेही स्पष्टता नव्हती. ते भाजपच्या वाटेवर आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. परंतु दोन दिवसात निर्णय जाहीर करू ,असे अशोक चव्हाण यांच्या कडून जाहीर करण्यात आलं होतं. दरम्यान, आज सकाळपासूनच भाजपात त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत होतं. तर आज सकाळी 11 वाजता अशोक चव्हाणांनी पक्षप्रवेशाची अधिकृत माहिती दिली.
त्यांचा हा प्रवेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित होणार होता, परंतु त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर स्वाक्षरी केली आणि अशोक चव्हाण यांना सुप्त केली.