शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाकरिता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्यानंतर रमेश बैस यांची नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. भगतसिंग कौश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी मंजूर केला.
भगतसिंह कौश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहिले. भगतसिंह कौश्यारी आणि अनेकदा महाराष्ट्र राज्य, महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात आंदोलने निषेध व्यक्त करण्यात आले होते. यानंतर राज्यपाल भगतसिंह कौश्यारी यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता, त्यानंतर आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला.
रमेश बैस यांची माहिती –
मोदींच्या भाजपमध्ये वाजपेयीकालीन भाजपा नेते केंद्रीय वर्तुळातून बाहेर फेकले गेले, त्यापैकी रमेश बैसही होते.सक्रिय राजकारणातून त्यांना भाजपाने निवृत्त केले, तरी त्रिपुरासारख्या ईशान्येकडील भाजपासाठी महत्त्वाच्या राज्यामध्ये बैस यांची राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली. मग, त्यांना जुलै २०२१ मध्ये झारखंडचे राज्यपाल केले गेले. आता त्यांना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बैस यांची नियुक्ती मोदी-शहांचा त्यांच्यावरील विश्वास स्पष्ट करते! बैस मूळचे एकत्रित मध्य प्रदेशच्या रायपूरमधील. तिथे त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढवून राजकीय प्रवास सुरू केला. १९८० मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली. १९८९ मध्ये बैस यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली, ते रायपूरमधून पाचवेळा लोकसभेचे खासदार बनले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारांमध्ये बैस मंत्रीही झाले.