पिंपरी चिंचवड लघूउद्योग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी संघटना कार्यालय सद्गुरू प्लाझा थर्मेक्स चौक चिंचवड या ठिकाणी सायंकाळी ५.०० वा. पार पडली. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संदीप बेलसरे यांची अध्यक्ष म्हणून सार्वानुमते निवड करण्यात आली आणि त्यांच्या अध्यक्षते खाली अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.
संघटनेने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा संघटनेचे सचिव जयंत कड यांनी घेतला. संघटनेने लघुउद्योजकांना वाढीव आलेल्या वीज बिलासाठी महावितरण कार्यालय भोसरी येथे आंदोलन करून वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच उद्योग मंत्री उदयजी सामंत व भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांचेकडे शास्तीकर सरसकट माफीसाठी सतत पाठपुरावा करून आमदार भोसरी यांचेमार्फत विधिमंडळात शास्तिकर सरसकट माफ करून घेतला. महावितरण भोसरी डिव्हिजनचे तीन सब डिव्हिजनमध्ये विभाजन करण्यात आले.
खजिनदार संजय ववले यांनी सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षाचा ताळेबंद वाचून सभेत मांडला व तो सर्वानुमते मंजूर कण्यात आला.
वार्षिक सर्वसाधारण सभेला अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी मार्गदर्शन केले. संघटना नवीन सभासद वाढविण्याकरिता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. तसेच ज्या एरियातील सभासदांना काही समस्या आल्यास त्यांच्याच एरियातील संचालकांनी व इतर संचालकांच्या माध्यमातून ती समस्या सोडविण्याकरिता त्या सभासदाला मदत करण्याचे ठरविण्यात आले.
वार्षिक सर्वसाधारण सभेस उपाध्यक्ष – संजय जगताप, विनोद नाणेकर, संचालक- संजय सातव, नवनाथ वायाळ, प्रवीण लोंढे, प्रमोद राणे, सचिन आदक तसेच स्विकृत संचालक- तात्या सपकाळ, माणिक पडवळ, संजय भोसले, श्रीपती खुणे, सुरेश गवस, नरेंद्र निकम, प्रमोद दिवटे, अजय लोखंडे, गौरंग बनकर, गणेश खेडकर व संघटनेचे सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन सचिव जयंत कड यांनी केले तर आभार संजय जगताप यांनी मानले.