शबनम न्यूज , प्रतिनिधी :
खासदार स्वर्गीय गजानन बाबर हे सर्वसामान्यांच्या संकटाच्या काळात संकट मोचक म्हणून धावून जात असे प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सर्वसामान्यांसाठी संघटना उभी केली. नागरिकांची छोटी-मोठी कामे करीत त्यांच्याशी संवाद वाढवत सामाजिक कार्यास सुरुवात केली .ते नगरसेवक ,आमदार व खासदार झाले त्यांची संघर्षमय कथा सांगणारे संघर्ष यात्री हे पुस्तक नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम संसद रत्न खासदार स्वर्गीय गजानन बाबर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित संघर्षयात्री या तानाजी गोरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सोमवारी संध्याकाळी रामकृष्ण मोरे सभागृह येथे संपन्न झाले.या वेळी शरद पवार बोलत होते.
खासदार संजय राऊत यांनी स्वर्गीय गजानन बाबर यांच्या अनेक आठवणी सांगितल्या सन 1972 पासून शिवसेनेत असलेल्या गजानन बाबर यांनी कायम संघर्ष केला कोणासमोर वाकणार नाही, झुकणार नाही, मोडणार नाही आणि स्वतःला विकणार नाही ही बाळासाहेबांची शिकवण शिवसैनिकांमध्ये आहे तीच शिकवण स्वर्गीय गजानन बाबर यांनी कायम ठेवली असे संजय राऊत यांनी सांगितले.
माजी महापौर तथा शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे व भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांनी स्वर्गीय गजानन बाबर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. संजोग वाघेरे यांनी आपण महापौर पदावर विराजमान होण्याआधी कशाप्रकारे गजानन बाबर यांना विनंती केली व महापौर पद मिळविले याविषयी आठवणी सांगितल्या.
या पुस्तक प्रकाशन सोहळा प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील खासदार अमोल कोल्हे माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी आमदार महादेव बाबर यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच पक्षीय नेते सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक यांच्यासहअनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष योगेश बाबर ,उद्योजक धीरज बाबर, उद्योजक अमित बाबर ,उद्योजक युवा नेते सुरज बाबर ,उद्योजक सुमित बाबर यांच्यावतीने करण्यात आले.
स्वर्गीय गजानन बाबर यांच्या जीवनातील अनेक घटनांचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.