शबनम न्युज | बारामती
आज बारामतीत नमो महारोजगार मोळाव्यानिमित्त अनेक दिग्ग्ज नेते एकत्र आले आहेत. बारामतीत आज नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस- शरद चंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच सुनेत्रा पवार देखील एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. या प्रसंगी बोलताना फडणवीस यांनी अजित पवारांची स्तुतिसुमने उधळली आहेत.
ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने प.महाराष्ट्रातील हा मेळावा बारामतीत होत आहे. तसेच गृहमंत्री पद मी तुम्हाला देणार नाही, पण गृह खात्यासाठी तुमची मदत नक्कीच घेईल, असेही फडणवीस यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, अजित पवारांनी नमो रोजगार मेळाव्यासाठी खूप मेहनत केली आहे. या मेळाव्यासह बारामतीमधील बस स्थानक आणि पोलीस आयुक्तांच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्याहस्ते झाले. याचा उल्लेख करत अजित पवारांच्या नेतृत्त्वात बारामधील बस स्थानक हे एखाद्या विमानतळासारखं वाटावं, एवढं सुंदर व सुसज्ज आहे. बारामतीमधील पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त कार्यालय किंवा पोलिसांच्या क्वार्टर्सच्या इमारती पाहिल्यावर हे सरकारी बांधकाम आहे, असं वाटतच नाही. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं असावं एवढं सुंदर कार्यालय अजित दादांनी बारामतीकरांना दिलं आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.