शबनम न्युज | पुणे
एमआयएम चे पक्षाचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. भेटीगाठी, पदयात्रा रोज सुरू आहेत. अशाच पद यात्रेदरम्यान अनिस सुंडके यांनी पुण्यामध्ये टिपू सुलतान यांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली आहे. भव्य असे स्मारक उभारण्याचा त्यांनी आपला निश्चय बोलून दाखविला.
टिपू सुलतान हे खरे स्वातंत्र्यवीर होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते इंग्रजांशी लढले आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. पुण्यातील नागरिकांना खास करून तरुणांना देखील त्यांच्या शौर्याची गाथा कळली पाहिजे. या हेतूने हे स्मारक उभारले जाणार आहे, असे ते पुढे म्हणाले.
यावेळी बोलताना अनिस सुंडके म्हणाले, आता पर्यंतच्या खासदारांनी आपल्या अल्पसंख्यांक तसेच वंचित समाजाला दुर्लक्षित केले. मुस्लिम समाजाचा वापर फक्त आपली व्होटबँक म्हणून केला. परंतु आता आपल्याकडे एक संधी चालून आली आहे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने आपल्याला दिली आहे, ती म्हणजे मतदानाचा हक्क. त्यामुळे या निवडणुकीत तुमच्याकडे एक संधी आहे. आपल्या समाजासाठी झटणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याची. येत्या 13 तारखेला पतंग या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला भरघोस मतांनी निवडून देण्याची आवाहन उपस्थित नागरिकांना केले.
पुण्यातील गुलटेकडी भागात सुंडके यांची प्रचार पदयात्रा होती. त्यामध्ये त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनिस सुंडके यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यात आले. यावेळी एमआयएम पक्षाचे विविध कार्यकर्ते उपस्थित.