शबनम न्युज | पुणे
पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी नुकतीच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून बाहेर पडले. यानंतर वसंत मोरे यांना अनेक पक्षांची ऑफर देखील येत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देखील पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरे यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी देखील राष्ट्रवादी देण्याची विनंती केली होती. मात्र आज वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर आता वसंत मोरे शरद पवार गटात जाण्याची चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांचे स्पष्टीकरण खुद वसंत मोरे यांनी दिले आहे.
वसंत मोरे म्हणाले, पुणे लोकसभा मतदारसंघाचे सध्याची स्थिती काय आहे. याबाबत मी शरद पवारांसाहेबांना माहिती दिली. त्यांना सर्व परिस्थिती माहिती आहे. मी उभा राहिल्यास कसा निवडून येऊ शकतो? याबाबतची माहिती मी त्यांना दिली. तसेच जयंत पाटील यांनी काही गोष्टी लेखी स्वरूपात मागवल्या होत्या. त्या मी आज दिल्या आहेत. तसेच आपण राजकीय निर्णय घेण्यासाठी आणखी वेळ घेणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
मी लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, याबाबत जोशींनी माझी भेट घेतली होती. मी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. मला मनसे मधील अनेक नेत्यांचे फोन आले. मात्र, मी परतीचे दोर कापलेले आहेत, असे यापूर्वीच वसंत मोरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.