शबनम न्युज | पिंपरी
आज शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) मावळ लोकसभा मतदार संघाच्या वतीने “युवा महाराष्ट्र मेळावा” खोपोली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास युवासेना महाराष्ट्र सचिव वरुण सरदेसाई यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर युवासेना शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन युवा स्वाभिमान पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अमोल श्रीराम खरात, युवा स्वाभिमान पार्टी पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख तौफिक शेख, युवा स्वाभिमान पार्टीचे शहर सचिव वाल्मीक थोरात तसेच हेल्प ऑफ पीपल चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी स्वप्निल अनिल जाधव आदी मान्यवरांचा युवासेना महाराष्ट्र सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासेनेत जाहीर प्रवेश घेण्यात आला.
सदर मेळाव्यास युवासेना कोअर कमिटी सदस्य योगेश निमसे, मावळ लोकसभा मतदारसंघ निरीक्षक डॉ. शैलेश जी मोहिते पाटील, पिंपरी, चिंचवड, मावळचे विस्तारक विशाल ससाणे, जिल्हा प्रमुख अनिकेत घुले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.