शबनम न्युज | पिंपरी
महायुती मधील शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यांचे सर्व निर्णय आम्हाला मान्य असतील. दीड महिन्यानंतर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने खासदार झालेले दिसतील, असे सांगत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बारणे यांच्या उमेदवारी वर शिक्कामोतर्फ केले. ते चिंचवड येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, शिवतारे यांच्याबाबत निर्णय वर्षा बंगल्यावर होईल. कोणी कुठेही गेले तरीही 2024 सगळ्या मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार विजयी होणार आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील. ही काळ्या दगडावरची रेष आहे. मी स्वतः खासदारकीसाठी इच्छुक नाही, परंतु रत्नागिरी-सिंधुदुर्ग ची जागा शिवसेनेची होती, ती शिवसेनेला मिळावी अशी अपेक्षा आहे.