शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महायुतीचे इच्छुक उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे महायुतीत असून ते मावळ लोकसभा मतदारसंघ कोणत्या चिन्हावर व पक्षातून लढणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. या चर्चेला आज पूर्णविराम देण्यात आला आहे. खासदार श्रीरंग बारणे भाजप कडून नव्हे तर शिवसेनेकडूनच निवडणूक लढणार असल्याचे बारणे यांनी सांगितले आहे. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे. काल उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात खासदार बारणे पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे सांगत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला. यानंतर आज पिंपरीत प्रसार माध्यमांशी बोलताना बारणे कोणत्या चिन्हावर व कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील विचारले असता ते म्हणाले, मी शिवसेनेकडूनच आतापर्यंत लढलो आहे, 2024 ची लोकसभा देखील मी शिवसेनेकडूनच लढवणार, असे त्यांनी सांगितले.