शबनम न्युज | पुणे
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडीच घेतली होती. पण जिंकलो आम्हीच. लोकसभा निवडणुकीतही तेच होणार, आमचा उमेदवार त्यांच्या तोडीस तोडत देणारा असणार, पण तोच काँग्रेसला कसबाप्रमाणेच विजय देखील मिळवून देईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना लवकरच आमचा उमेदवार जाहीर होईल, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, पक्षाच्या तसेच महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांबरोबरच पुण्यातील उमेदवार ही जाहीर होईल, आमची आज शुक्रवारी संयुक्त बैठक आहे. त्यामध्ये जागा व उमेदवार यावर चर्चा होईल, आमचा उमेदवार तयार आहे, त्याचे नाव लवकर जाहीर करू, असे ते म्हणाले.
Advertisement