विभागात कोरोना बाधित 10 लाख 93 हजार 545 रुग्ण –विभागीय आयुक्त सौरभ राव
शबनम न्युज / पुणे
पुणे विभागातील 9 लाख 22 हजार 740 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 93 हजार 545 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 49 हजार 954 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 20 हजार 851 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.38 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 82 हजार 993 रुग्णांपैकी 6 लाख 68 हजार 728 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 2 हजार 190 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 हजार 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.54 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.41 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 91 हजार 687 रुग्णांपैकी 72 हजार 426 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 114 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 147 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 88 हजार 821 रुग्णांपैकी 73 हजार 274 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 27 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 68 हजार 41 रुग्णांपैकी 54 हजार 961 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 10 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 62 हजार 3 रुग्णांपैकी 53 हजार 351 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 613 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 15 हजार 366 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 989, सातारा जिल्ह्यात 1 हजार 695, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 723, सांगली जिल्ह्यात 1 हजार 175 तर कोल्हापूर जिल्ह्यात 784 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 929 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 853, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 3, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 74, सांगली जिल्हयामध्ये 642 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 357 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 63 लाख 49 हजार 690 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 10 लाख 93 हजार 545 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.