राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती
शबनम न्युज / मुंबई
काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज त्यांना नियमित तपासणीसाठी पुन्हा ब्रिच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या तोंडात अल्सर आढळून आल्यानंतर तो काढण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
आदरणीय खा. @PawarSpeaks यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आज त्यांना नियमित तपासणीसाठी पुन्हा ब्रिच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या तोंडात अल्सर आढळून आल्यानंतर तो काढण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांनी दिली. pic.twitter.com/0AToN1hkKA
— NCP (@NCPspeaks) April 25, 2021
यावेळी नवाब मलिक म्हणाले कि, खासदार शरद पवार साहेब यांची प्रकृती उत्तम असून ते आता रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. सध्या साहेब रुग्णालयातूनच कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत व सरकारला योग्य ते निर्देश देत आहेत. ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.