शबनम न्युज : प्रतिनिधी
नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रयत्नांना यश…
पिंपरी : प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता आत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे आज या रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात आली असून लवकरच हा रस्ता आत्याधुनिक पद्धतीने स्मा
कुणाल आयकॉन रस्ता हा खूप रहदारीचा व वर्दळीचा आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निवासी सोसायट्या, शाळा, व्यावसायिक दुकाने आहेत त्यामुळे हा रस्ता खूप महत्वाचा आहे ही बाब नाना काटे यांनी याबाबत आयुक्त, अति-आयुक्त, स्थापत्य प्रकल्प , स्मार्ट सिटी विभाग, यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटून नागरिका समवेत महापालिकेत चर्चा करून त्यांच्या निदर्वेशनास आणून दिली व त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा देखील केला त्यास अनुसरून यशप्राप्ती म्हणून आज दि १५/०३/२०२४ रोजी महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने निविदा काढण्यात आली आहे व लवकरच या रस्त्याचे काम देखील चालू होणार आहे.