शबनम न्युज | पुणे
लोकसभा निवडणुकांमुळे सीए अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्ट अकाउंटंट ऑफ इंडियाने आयसीएआय सनदी लेखपाल अभ्यासक्रमाच्या इंटर, फायनल आणि फाउंडेशन या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. निवडणुकांमुळे परीक्षांची तारखांमध्ये बदल शक्य असल्याची माहिती आयसीआय कडून यापूर्वी देण्यात आली होती. त्यानुसार हे बदल करण्यात आले आहेत. आता परीक्षेची नवीन वेळापत्रक उद्या म्हणजेच 19 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहेत.
आयसीआयने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, इंटरमिजिएट गट एकची परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी होणार होती. गट दोनची परीक्षा ९, ११ आणि १३ मे रोजी होणार होती. सीए अंतिम गट एकची परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी, गट दोनची परीक्षा ८, १० आणि १२ मे रोजी घेण्यात येणार होती. तर फाउंडेशन परीक्षा २०, २२, २४ आणि २६ जून रोजी देशभरातील परीक्षा केंद्रांवर घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांसाठीची अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारीला पूर्ण झाली आहे.