शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ग्राहकांना सदनिका दाखवत असताना बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्ह चा मृत्यू झाला आहे. ही घटना 23 डिसेंबर 2023 रोजी वाकड मधील निसर्ग बेलारोज सोसायटी येथे घडली.
आशिष जवेरी (वय ४३) असे मृत्यू झालेल्या सेल्स एक्झिक्युटिव्ह चे नाव आहे. याप्रकरणी आशिष यांच्या पत्नीने मंगळवारी (दि.१९) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार गुड्डू कसून पवार (वय ४०, रा. भूमकर वस्ती हिंजवडी) आणि सेल्स विभाग प्रमुख अभिषेक अभय देवणे (वय २६, रा. वाकड) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे निसर्ग बेला रोज सोसायटी या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे आशिष सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. २३ डिसेंबर रोजी ते ग्राहकाला फ्लॅट दाखवण्यासाठी गेले होते. सहाव्या मजल्यावरून सदनिका दाखवत असताना त्यांचा तोल जाऊन ते लिफ्टच्या डफ्ट मध्ये पडले. बांधकामाचे ठेकेदार आणि सेल्स विभागाचे प्रमुख यांनी बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.