शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीला, पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः एक्स पोस्ट करत याविषयीची माहिती दिली आहे.
काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईन. अशी पोस्ट दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.
Advertisement