शबनम न्युज | पुणे
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत पाच उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत नगर दक्षिणमधून निलेश लंके तर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज मुंबईत पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, कालच निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, त्यांच्या राजीनाम्याची रिसीट आज आम्हाला मिळाली. मैत्रिपूर्ण लढतीची काँग्रेसच्या नेत्यांनी मागणी केली आहे, पण अजून निर्णय झालेला नाही. आमचा सर्वच पक्षांना सोबत घ्यायचा प्रयत्न आहे. आमची अपेक्षा अशी आहे की, भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकीच बळ दाखवण्याची गरज आहे. काही लोक वेगळं उभं राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं त्याने आपली मत फुटतील आणि पर्यायाने भाजपाच्या उमेदवाराला मदत होईल. याचा विचार करुन सगळेजण एकसंघ होण्याचा प्रयत्न करतील, असंही जयंत पाटील म्हणाले.
या पाच उमेदवारांची नाव जाहीर –
खा. सुप्रियाताई सुळे – बारामती
खा. अमोल कोल्हे – शिरुर
मा. निलेश लंके – नगर दक्षिण
अमर काळे – वर्धा
भास्करराव भगरे – दिंडोरी