शबनम न्युज | पुणे
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव, आळंदी. या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०६/११/२०२३ वार सोमवार रोजी सकाळी १०.०० वा. आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. कैलास अस्तरकर यांनी आरोग्य तपासणी शिबिर आयोजना बाबतची भूमिका सविस्तर मांडून उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या प्रसंगी आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. रामनाथ बच्छाव व डॉ. शुभांगी मॅडम यांनी केले.
डॉ.रामनाथ बच्छाव यांनी सध्याच्या काळात आरोग्याची काळजी घेणे तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे कशी काळाची गरज आहे या संदर्भात मत व्यक्त करून सर्व उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांना आरोग्य तपासणी करण्याचे आव्हान केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य कसे जतन केले पाहिजे यावर भाष्य करून आरोग्याशिवाय दुसरी कोणतीही मोठी संपत्ती नाही या संदर्भात विविध उदाहरणांचे दाखले देऊन स्वतःचे अनुभव कथन करीत विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
या आरोग्य तपासणी शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी, रक्तगट तपासणी, रक्तदाब व शुगरची तपासणी करण्यात आली. या वेळी 85 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी व 130 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुद्धा आरोग्य तपासणी करण्यात आली.
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांच्या संकल्पनेतून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या साठी त्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या आरोग्य शिबिरासाठी वरिष्ठ परिचारिका जोश्ना बधे,वरिष्ठ परिचारिका शामल गोसावी,अनिता गवळी, वर्षा तांबे,गंगा जाधव, अमृता वाव्हळ,मेरी पगारे, डॉ पांडुरंग मिसाळ,रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. संजीव कांबळे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. परमेश्वर भत्ताशे, प्रा. शाहुराज येवते, प्रा. विकास दिघे, प्रा.पारप्पा दुपारगुडे, प्रा.शैला वाळुंज,डॉ. छाया जोशी,प्रा. दिपाली ताम्हाणे,प्रा. सविता मानके, प्रा. यशोदा खुळखुळे,प्रा.समीना मोमीन, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. पारप्पा दुपारगुडे,प्रा.प्रेरणा पाटील, प्रा.सोनाली अभंग, प्रा. पूजा राणे, प्रा.पूजा खवले, कार्यालयीन प्रतिनिधी श्री.प्रविण भावे, सौ.वर्षा ताजणे, कु.नेहा लांडगे इत्यादी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. या वेळी विद्यार्थ्यांनी उत्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बाधिलकी जोपासली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.दिपाली ताम्हाणे यांनी मानले अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब दिली.