कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी
शबनम न्युज | मुंबई
महाविकास आघाडीत अनेक जागांवर मतभेद निर्माण झाल्याने कोणाला कोणती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज चार जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली.
Advertisement
उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी उमेदवारी जाहीर करण्याची मागणी केली. त्यावेळी कधी जाहीर करू असा प्रश्न ठाकरेंनी विचारला. तेव्हा पत्रकारांनी तत्काळ उत्तर देत आजच जाहीर करा, असं म्हटलं. त्यावर त्यांनी लागलीच कल्याण, पालघर, जळगाव आणि हातकंणगले येथील उमेदवारांची नावे जाहीर केली.
उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले उमेदवार
कल्याण लोकसभा मतदारसंघ – वैशाली दरेकर
पालघर लोकसभा मतदारसंघ – भारती कामडी
जळगाव – करण पवार
हातकंणगले – सत्यजित पाटील
Advertisement