शबनम न्युज | देहूरोड
देहू रोड पोलीस तपास पथकाकडून विशेष कामगिरी करण्यात आली आहे. वाहन चोरी करणाऱ्याला देहूरोड पोलीस तपास पथकाकडून अटक करण्यात आली. त्याच्यावर भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर इसमास अटक करण्यात आली आहे.
देहू रोड येथून फिर्यादी चंद्रकांत तलारी यांची मोटर सायकल दिनांक 29 मार्च 2024 रोजी स्वामी चौक, देहू रोड येथून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. चंद्रकांत तलारे यांनी देहूरोड पोलीस स्टेशन तपास पथकाकडे याची फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल केली असता, तपासादरम्यान सदर व्यक्ती विरोधात भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून 1 लाख 65 हजार रुपये किमतीच्या एकूण चार मोठ्या सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. देहूरोड पोलीस स्टेशनची तीन व वाकड पोलीस स्टेशनचा एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. याबाबत अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहे.
सदर कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडल दोनचे बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त देहूरोड विभागचे घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार राठोड, पोलीस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, संतोष जाधव ,सुनील यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, निलेश जाधव, मोहसीन अख्तर, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्निल साबळे, सागर पंडित यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.