शबनम न्यूज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी) जि. पुणे. या ठिकाणी आय.क्यू.ए.सी आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. दिलीप बारी यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकासासाठी कौशल्य वाढविण्याची आवश्यकता आहे या संदर्भात विवेचन करून कार्यक्रमाचा उद्देश आणि भूमिका सविस्तर रेखाटली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.श्री.सतीश बोरकर(सी.ए.) यांनी सर्व प्राध्यापकांना आपल्या अध्यापन कार्य कौशल्य पूर्ण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञाना चा अधिक वापर केला पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनाही अभ्यासक्रमा सोबत प्रात्यक्षिक कार्य (इंटर्नशिप )आवश्यक आहे ज्यामुळे त्यांना प्रत्येक्ष संकल्पना स्पष्ट होतील व कामाचा अनुभव नोकरीसाठी उपयोगी ठरेल. या साठी काही अकाउंटिंग मोड्युलसची माहिती त्यांनी दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हंसराज थोरात यांनी मनोगत व्यक्त करतांना आपल्या शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी अशा काही कौशल्याचा अभ्यास करणे अलीकडील काळात गरजेचे आहे.विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल सोबत प्रत्यक्ष कामाचा तसेच अनुभवाची संधी अलीकडील काळात उपलब्ध झाली आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करण्याची आवश्यकता व्यक्त केली. या कार्यक्रमाला डॉ. रेश्मा बोरकर तसेच श्री.हर्षल पाटील उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री.मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ.पांडुरंग मिसाळ,प्रा.संजीव कांबळे,डॉ.छाया जोशी, प्रा.सविता मानके प्रा.कैलासअस्तरकर, प्रा.परमेश्वर भत्ताशे, प्रा.शाहूराज येवते, प्रा. रोहित कांबळे, प्रा.महेश म्हसागर, प्रा.यशोदा आनेराव, प्रा.दिपाली ताम्हाणे, प्रा.दिपाली सोनावणे, प्रा.सोनाली अभंग, प्रा.माधुरी चौधरी, प्रा.पूजा खवले, प्रा.पूजा मिटकरी,डॉ.समीना मोमीन, श्री.प्रवीण भावे, सौ. वर्षा ताजणे, इत्यादी विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रिती बुऱ्हाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सुरेखा व्यवहारे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सांगता सामूहिक पसायदानाने झाले अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.