शबनम न्युज | पिंपरी
भारतीय जनता पार्टीच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त भाजपा जेष्ठ नेत्या व विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात भाजपा जेष्ठ नेत्या डॅा.प्रतिभाताई लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी डॅा.प्रतिभाताई लोखंडे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, “केवळ अब की बार चारसौ पार असे म्हणून चालणार नाही, आपल्या उमेदवारांना मोदीजींच्या लोकप्रियतेमुळे मते मिळतीलच तरीसुद्धा सर्व कार्यकर्त्यांनी घरी घरोघरी जाऊन महायुतीचा प्रचार केला पाहीजे जनता जनार्दनाला मोदीजींसाठी आशिर्वाद मागीतला पाहीजे”
यावेळी आमदार उमाताई खापरे म्हणाल्या की, “डॅा.प्रतिभाताई लोखंडे यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती त्यामुळे पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त त्यांच्याच हस्ते हे ध्वजारोहण होणे महत्वाचे होते म्हणुन आज त्यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न होत आहे.”
याप्रसंगी डॅा.प्रतिभाताई लोखंडे यांचा स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या जेष्ठ नेत्या म्हणून आमदार उमाताई खापरे यांनी सत्कार-सन्मान करून आशिर्वाद घेतले.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, आमदार उमाताई खापरे, प्रदेश सदस्य नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, चंद्रकांत नखाते, माऊली थोरात, शहर सरचिटणीस अजय पाताडे. माजी उपमहापौर केशव घोळवे, भाजयुमोचे शहराध्यक्ष मा.उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे, नगरसेविका अनुराधा गोरखे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, प्राधिकरण मंडलाध्यक्ष राजेंद्र बाबर, महीला मोर्चा प्रदेश सचिव कविता हिंगे, भाजयुमोच्या प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, जेष्ठ नेते विजय शिनकर, रविंद्र देशपांडे, गणेश लंगोटे, कैलास सानप, गणेश वाळुंजकर, नरेंद्र आमले, विशाल वाळुंजकर, देवदत्त लांडे, जयदेव डेंब्रा, नंदू भोगले, जयदीप खापरे, सतीश नागरगोजे, पल्लवी पाठक, नीता कुशारे, दिपाली कलापुरे, दिपाली धनोकार, राधिका बोर्लीकर यासंह महिला मोर्चा, युवा मोर्चा, पक्षाचे असंख्य पदाधिकरी व जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रिडा आघाडीचे शहराध्यक्ष जयदीप खापरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी सुत्रसंचालन तर मा.उपमहापौर केशव घोळवे यांनी आभार मानले.