शबनम न्यूज ; प्रतिनिधी :
शिरूर लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चिरंजीव अपूर्व शिवाजी आढळराव पाटील प्रचाराकरिता मैदानात उतरले आहेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात विविध मंडळांना भेटी दिल्या तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत, शिरूर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव अढळ राव पाटील यांच्या विजयाचा संकल्प केला तसेच संपूर्ण मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी घेणे, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे व मित्र पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मतदार संघातील प्रचाराचा आढावा घेणे तसेच मार्गदर्शन करणे अपूर्व आढळराव पाटील यांच्या वतीने सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व भाजप , आर पी आय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक राहुल भोसले , एडवोकेट संकेत चावरे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार नागरिक उपस्थित होते.