शबनम न्युज | बारामती
बारामती शहरातील कसबा जामदार रोड परिसरात खत्री पवार एन्क्लेव्ह इमारतीमध्ये सदनिकेत पती-पत्नीचा भर दिवसा खून झाल्याची घटना घडली आहे. शनिवार दिनांक 13 सकाळी पावणेअकरा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात या खुनाचा उलगडा केला आहे.
सचिन महालिंग वाघोलीकर (वय 50 ) आणि सारिका सचिन वाघोलीकर (वय ४२) असे खून झालेल्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर वाघोलीकर दाम्पत्य राहत होते. त्यांच्या गळ्यावर वार केलेले असून हाताची नस कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहे. ही घटना घडली त्यावेळी वाघोलीकरयांची मुले कन्हेरी इथे देवदर्शनासाठी गेली होती. मुले परत आल्यानंतर त्यांच्या सदनिकेला बाहेरून कडी लावल्याचे दिसून आले. कडी काढून दरवाजा उघडल्यानंतर वाघोलीकर दाम्पत्याचे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आले. तसेच बेडरूम मधील कपाट दुसऱ्या खोलीतील डबे अस्ताव्यस्त पडल्याची आढळले.
पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक घोळवे व इतर अधिकारी अंमलदार यांनी तपास सुरू करून पथके तयार करून तपास सुरू केला. त्यात पोलिसांना हा गुन्हा आर्थिक कारणावरून एका इस्मानी केला असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. अधिक तपास बारामती पोलीस करीत आहे.