शबनम न्युज | पिंपरी
भारतीय सैन्य दलातील आर्मी ऑर्डीनन्स कॉर्पस डे (AOC) यांचा २४९ वा वर्धापन दिवस दि:07 एप्रिल 2024 रोजी समीर लॉन्स, रावेत येथे साजरा करण्यात आला. दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने रावेत- किवळे- विकासनगर- मामुर्डी तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील AOC कोर चे माजी सैनिक यांच्या वतीने हा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप हे उपस्थित होते. तसेच गटनेते भाजपा पिं. चिं नामदेव ढाके, रावेत काळेवाडी मंडळ अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, साउथ इंडियन सेल प्रमुख सुरेश नायर, रावेत काळेवाडी मंडळाचे पदाधिकारी प्रदीप बिजगे, सचिन गावडे, उपाध्यक्ष अजय भोंडवे, निखिल जाधव, तसेच सुरेश भोंडवे, संतोष भोंडवे , सुनील भोंडवे आदी उपस्थित होते. AOC माजी सैनिक श्री साळुंखे, बी एन धोत्रे, श्री भट, यु बी पाटील.श्री आरेकर, सुनील सूर्यवंशी, आर के सिंग, श्री लगाडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन पाहिले. कार्यक्रमादरम्यान विविध प्रकारचे देशभक्ती फिल्मी गायन सादर करण्यात आले.
उपस्थित सर्व सैनिकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सैन्य दलात असताना आपलं कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सर्व वीरांचेही गौरव करण्यात आले .जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्राची एकात्मता, सुरक्षा, यामधील सैन्य दलाचा महत्व सांगितले. सरकारमार्फत त्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा तसेच भविष्यात राबवण्यात येणाऱ्या धोरणासंदर्भात ही माहिती दिली. उपस्थित अनेक माजी सैनिकांनी आपले सैन्य दलातील अनुभव आणि कार्यक्रमासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. ” श्री दीपक भोंडवे यांनी दोन वर्षांपूर्वीही परिसरातील सर्व माजी सैनिकांना एकत्रित आणून असाच एक आगळावेगळा माजी सैनिक सोहळा साजरा करण्यात आला होता. असे मत ज्येष्ठ माजी सैनिक साळुंखे यांनी व्यक्त केले.” सर्व माजिक सैनिकांनी दिपक भोंडवे सोशल फाउंडेशन यांनी केलेल्या कार्याचे कौतुक ही केले. आयोजक दिपक भोंडवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित सर्व मान्यवर आणि माजी सैनिकांचे आभार व्यक्त करत सर्व सैनिकांसाठी असंच कार्य करत राहणार आहे असे वचन दिले.