शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी मध्ये स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी परदा फाश केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. तसेच यात पिढीत तीन महिलांची सुटका करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने शुक्रवार (दि. ५) रोजी हिंजवडी येथील ब्रीद स्पा मध्ये ही कारवाई केली.
स्पा व्यवस्थापक पवन बाळासाहेब वनवे (वय २१, रा. जुनी सांगवी) स्पामालक दीपक ज्योतीराम कोल्हापूरकर (वय ४०, रा. वडगाव पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ यांनी याप्रकरणी शनिवार (दि.६) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा च्या नावाखाली काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जास्त पैशाची आम्हीच दाखवून पीडित महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात, अशी माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष बघायला मिळाली. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्रीद स्पा येथे छापा टाकून कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करसुटी, भगवंता मोटे, गणेश कारोटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांच्या पथकाने कामगिरी केली.