शबनम न्युज | पुणे
आज बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी त्यांनी सकाळी अजित पवार यांच्यासोबत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे. आज सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल होणार असून, अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहत आहेत.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात लोकसभा निवडणुका होत असून, त्या चांगल्या वातावरणात पार पाडाव्यात. राज्यात महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी प्रार्थना गणराया चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांना शक्ती प्रदर्शन बाबत विचारले असता, ते म्हणाले, शक्तिप्रदर्शन वगैरे काही नाही. महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मी उपस्थित राहणार आहे. अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शन वगैरे काही नाही. महायुती मधील प्रत्येक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे एवढेच आवाहन केल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी सुनेत्रा पवार म्हणाले की, मागील काही महिन्यांपासून बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी नागरिकांची भेट घेत आहे. त्या प्रत्येक ठिकाणी नागरिक मोठ्या उत्साहात स्वागत करीत आहे. माझ्याशी संवाद साधत आहे आणि आज बारामती लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करीत आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने आजचा दिवस खूप मोठा आहे. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि आरती देखील केली. जनसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळूदे आणि मोठा विजय मिळू दे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली आहे.