शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे 23 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज आज पासून म्हणजेच गुरुवार (दि. 18 एप्रिल) रोजी भरण्यास प्रारंभ होत आहे. या मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर केली आहे.
यंदा पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड मधील स्थानिक उमेदवारांमध्ये आणि दोन्ही शिवसेनेत लढत होत आहे, त्यामुळे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. 18 ते 25 एप्रिल या कालावधीत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. 26 एप्रिलला उमेदवार अर्जंती छाननी होणारा असून 29 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे, तर 13 मे रोजी मतदान होणार आहे.