शबनम न्युज | पुणे
आज बारामती लोकसभा मतदारांच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडली. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती सभा पार पडली. यावेळी बोलताना बारामती लोकसभा मतदारांच्या उमेदवार सुनेत्रा पवार म्हणाल्या कि, जनसागराच्या प्रचंड लाटेवर स्वार होऊन पार पडलेली जाहीर सभा अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पार पडलेल्या या महासभेने मला बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या विजयाचा विश्वास अधिकच भक्कम केला, बळकट केला.
पुणे येथील जिल्हा परिषदेशेजारी पार पडलेल्या या जाहीर सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, ना. चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, खा. मेधा कुलकर्णी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, आ. भीमरावअण्णा तापकीर, आ. दत्तामामा भरणे, आ. राहुल कुल, आ. माधुरी मिसाळ, आ. महेश लांडगे, आ. दिलीप मोहिते, आ. अतुल बेनके, आ. सुनील टिंगरे, आ. चेतन तुपे, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. अश्विनी जगताप, माजी आमदार रमेशआप्पा थोरात, शरद ढमाले, अशोक टेकावडे, योगेश टिळेकर, माजी खासदार प्रदीप रावत यांच्यासह अनेक आजी, माजी आमदार महायुतीतील सर्व घटक पक्षांचे राष्ट्रीय, राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाल्या, माझ्या पाठीशी असलेले जनतेचे प्रेम आणि राज्य व केंद्र शासनाच्या भक्कम पाठबळावर बारामती लोकसभा मतदार संघात जनसंपर्क आणि कामाच्या बळावर विकासाच्या प्रक्रियेला गतिमान करेन. असे त्या म्हणाल्या.
यावेळी महायुतीच्या पाठीशी एकवटत असताना उबाठा शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने पुणे जिल्ह्यासह विशेषतः भोर राजगड मुळशी विधानसभा मतदार संघात महायुतीच्या मताधिक्यात मोठी वाढ होणार आहे. असे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.