शबनम न्यूज | पिंपरी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दिपक सींगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली अदित्य बिर्ला हॉस्पिटल चिंचवड येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचारी आणि तेथे जमलेल्या रुग्णांचे नातेवाईक तसेच २०५ चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते. मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये या भागातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली. यामध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचारी आणि तेथे जमलेल्या रुग्णांचे नातेवाईक मतदारांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला व त्यांचेकडून मतदान प्रतिज्ञा म्हणून घेणेत आली.