शबनम न्युज | पिंपरी
मावळ लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ ) पक्षाचा पाठिंबा महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांना देण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचे आदेशाने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आकाश चतुर्वेदी यांच्या जनसंपर्क कार्यालयात संजोग वाघेरे यांचा सन्मान करण्यात आला तसेच पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यावेळी कैलास जोगदंड, समवेत पिंपरी चिंचवड शहर कमिटी व मावळ विधानसभेचे सर्व प्रभारी यांच्यावतीने संजोग वाघेरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रिकी परदेशी, पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष तुषार कांबळे, महिला आघाडीचे अध्यक्ष सोनवणे ताई ,तसेच चिंचवड विधानसभा प्रभारी युवराज चखाली, चिंचवड विधानसभा प्रभारी विनायक कुचेकर, मावळचे कार्यकर्ते नारायण पारखे, अवधूत पारखे ,सुनील डांगे, दिलीप शेंडगे, किरण पाषाणकर, नंदकुमार पाडळे, बाळासाहेब लांडगे, लक्ष्मी जोगदंड, सीमाताई ढोले कांबळे, राम कदम , दिनेश माने , सूरज कुचेकर ,सागर लोंढे ,शिवाजी आखाडे ,प्रवीण दिवटे यांचे सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.