आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त आयोजन
सूत्रसंचालन वल्लरी आपटे यांनी केले. तर नृत्य कार्यक्रमाचे निवेदन अदिती कुलकर्णी यांनी केले.यावेळी मनिषा साठे यांच्या सर्व शिष्यांनी त्यांचा सत्कारही केला .अजय पराडे, शमा भाटे, अतुल उपाध्ये, अजय धोंगडे, केदार पंडित, रवींद्र दुर्वे ,नितीन सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
*नृत्यातून प्रकटावेत नवोन्मेष ! :मनीषा साठे*
आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त आयोजित ‘अनुवेध‘ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नृत्य गुरु पं.मनीषा साठे म्हणाल्या,’
शिष्यांनी नृत्य सादर करताना वा नृत्य रचना करताना, पूर्वी स्वतः वा दुसऱ्याने केलेल्या रचना वा विचारांची पुनरावृत्ती करू नये, तर प्रत्येक वेळी नवनवीन विचार , कथा, संकल्पना व नृत्य रचना नाविन्यपूर्ण सादर करावी अशी माझी अपेक्षा असते, आणि या कसोटीमध्ये या वर्षीही माझ्या शिष्या यशस्वी झाल्या.नृत्यातून नवोन्मेष प्रकटावेत आणि त्यासाठी परिश्रम घ्यावेत.देशाला आणि पुण्याला नृत्याची उज्वल परंपरा आहे,ही परंपरा पुढे नेण्यासाठी योगदान द्यावे’.
ज्येष्ठ कला समीक्षक आशीष खोकर म्हणाले,’आज ज्या नृत्यांगनांनी नृत्य सादर केले ते अतिशय उत्तम तयारीचे होते.कथक नृत्याचा दिल्ली हा गड नसून खऱ्या अर्थाने पुणे हाच नृत्याचा गड आणि धरोहर आहे.पुणे हे संपूर्ण भारत देशालाच नव्हे तर जगाला भरतनाट्यम आणि कथक नृत्याच्या दृष्टीने सतत प्रेरणा देणारे शहर आहे, आणि यात अर्थातच नृत्य गुरूंचा वाटा, त्यांचं ज्ञान आणि परिश्रम महत्वाचे आहे,