शबनम न्यूज | पुणे
लोकप्रिय भावगीत गायक स्व. अरुण दाते यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा अरुण दाते कला सन्मान पुरस्कार यावर्षी सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रामूभैया दाते स्मृती समिती व अतुल अष्टेकर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येईल, अशी माहिती अतुल दाते यांनी दिली.
स्व. अरुण दाते यांच्या 90 व्या जयंतीचे औचित्य साधत रवींद्र साठे यांना हा पुरस्कार राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते (दि.09 ) मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणाऱ्या ‘शुक्रतारा’ या कार्यक्रमादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे. रवींद्र साठे एक प्रसिद्ध गायक असून दूरदर्शनवरील त्यांच्या विविध सांगीतिक कार्यक्रमांमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत.
Advertisement