शबनम न्यूज | पुणे
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात आतापर्यंत तब्बल 9 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 64 लाख रुपयांची रोकड, साडेतीन लाख लिटर मद्य, एक क्विंटल अमली पदार्थांचा साठा व 2 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. लोकसभेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आणि गैरप्रकार राखण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 135 भरारी पथके, 129 दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यानुसार शहरात, जिल्ह्यात पथके तैनात तयार करण्यात आले असून, वाहनांमधून रोकड मध्य अमली पदार्थांसह सोने, चांदी, हत्यारे, शस्त्र आदींची वाहतूक आणि साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत पुणे पोलिसांच्या हद्दीत 41 हजार 375 रुपयांची तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत 63 लाख 90 हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर पुणे पिंपरी पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक व उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत तीन लाख 47 हजार 623 लिटर मध्ये साठा जप्त करण्यात आला आहे. या मद्य साठ्याचे बाजार मूल्य 1 कोटी 71 लाख रुपये इतकी आहे, तर 109 किलो 958 ग्रॅम अमली पदार्थांचे साठा पुणे, पिंपरी व जिल्ह्यातील जप्त करण्यात आला आहे. तर 2 किलो 72 ग्राम सोने जप्त करण्यात आले आहे. याचे बाजार मूल्य 1 कोटी 59 लाख इतकी आहे. अन्य जप्त केलेल्या वस्तू 16 असून त्यांची किंमत 4कोटी दोन लाख रुपये इतकी आहे. त्यानुसार एकूण जप्त केलेल्या वस्तूंची किंमत 9कोटी आठ लाख 40 हजार 408 रुपये इतकी आहे.