शबनम न्यूज | भोसरी
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी लोकसभा मतदारसंघातील इंद्रिय नगर नेहरूनगर येथे मतदार नागरिकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
शिवाजीराव आढळराव पाटील यांचे सुपुत्र अपूर्व आढळराव पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. तसेच मोशी येथील प्राधिकरण सेक्टर सहा येथील त्रिवृक्ष संगम दत्त मंदिर येथे आरतीसाठी ते उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी भाजपा भोसरी इंद्रायणी नगर नेहरूनगर मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नांदुरकर, भाजपा पिंपरी चिंचवड जिल्हा सचिव गीता महेंद्र, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आशा काळे. भाजपा बूथ पदाधिकारी मीनाक्षी हांडे तसेच राष्ट्रवादीचे उद्योग आघाडीचे अध्यक्ष श्रीकांत कदम विजय लोखंडे सुरेश कर्डिले यांच्यासह प्रभागातील असंख्य नागरिक, मतदार व महायुतीचे सर्वच पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.