शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या सर्व पदाधिकारी, संचालक, स्वीकृत संचालक, सल्लागार, सभासद यांच्यावतीने नागरिकांना मतदान बजावण्याची आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागोजागी सर्व शासकीय, अशासकीय कार्यालयांमार्फत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच जागोजागी जनजागृतीही करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने देखील मतदारांना मतदान करण्याची आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या सर्व पदाधिकारी, संचालक, स्वीकृत संचालक, सल्लागार, सभासद, कर्मचारी वर्ग यांना पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या सर्व कामगार, ऑफिस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आपल्या कुटुंबातील मतदारासाठी निस्वार्थपणे मतदानाचा हक्क बजावण्यास तयार करावे, जेणेकरून भारताची लोकशाही बळकट होण्यास मदत होईल, असे देखील पत्रकात नमूद करण्यात आले आहे.