शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात सद्यस्थितीत सर्वत्र covid-19 या संसर्गजन्य रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात covid-19 रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी कोरोना रुग्णांना शहरात रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळणे अवघड होत आहे याचा परिणाम अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत ,तरी प्रभाग क्रमांक ३० येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शाळा ,फुगेवाडी येथे covid-१९ सेंटर व covid-19 लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका स्वाती माई काटे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे
Advertisement