शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात प्रभाग क्रमांक ३० मधील दापोडी , फुगेवाडी , कासारवाडी या परिसरातील मुख्य नाले ,गटार ,ड्रेनेज चेंबर पूर्णपणे साफ करण्यात यावे, दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे लवकरात लवकर करून घ्यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका स्वाती (माई) काटे यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे
दिलेल्या निवेदनात नगरसेविका स्वाती (माई) काटे यांनी म्हटले आहे की पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे त्वरित करून घ्यावी प्रमुख्याने प्रभाग क्रमांक ३० मधील दापोडी , फुगेवाडी , कासारवाडी या परिसरातील मुख्य नाले ,गटार ,ड्रेनेज चेंबर पूर्णपणे साफ करण्यात यावे, पावसाळ्यात परिसरातील नागरिकांच्या घरात घाण पाणी जाते या अनुषंगाने सदर पावसाळ्या पूर्वीची कामे केल्यास या अडचणी निर्माण होणार नाही, तसेच नागरिकांच्या आरोग्याला ही धोका राहणार नाही ,तरी नियमानुसार पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका स्वाती (माई) काटे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे