मावळ : (शबनम न्यूज प्रतिनिधी)
मावळ तालुक्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रचाराला येऊनही भाजपला पराभव पत्करावा लागला मावळ मधील नऊ पैकी सहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आले आहेत तर तीन ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात आल्या राज्यात सत्ता बदल होऊनही मावळात राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले.
मावळ मधील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पंचेचाळीस सदस्य बिनविरोध तर शिरगाव ग्रामपंचायत संपूर्ण बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील इंदुरी ,गोडुम्बरे देवले ,कुणेनामा , वरसोली , सावळा, भोयरे व निगडे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दिनांक 18 रोजी झाले होते तर मतमोजणी मंगळवारी सकाळी दहा वाजता मावळ तहसील कार्यालयात झाली मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व निवासी नायब तहसीलदार रावसाहेब साठे यांच्या उपस्थितीत मतमोजणी पार पडली.
शिरगाव ग्रामपंचायत संपूर्ण बिनविरोध तर इंदोरी व देवळे ग्रामपंचायतचे सदस्य संपूर्ण बिनविरोध झाले निगडे ग्रामपंचायत संपूर्ण जागांसाठी निवडणूक झाली तर वरसोली ०४ गोडुम्बरे ०३ सावळा ०३ कुणे नामा व भोयरे ०१ असे एकूण ४५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
ग्रामपंचायत व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इंदोरी (बीडी वायकर) गोडुंबरे व शिरगाव (दिपक राक्षे) कुणेनामा (श्रीनिवास पांचाळ) देवले व वरसोली (सुदाम वाळुंज) सावळा (अजिंक्य मेत्रे) भोयरे व निगडे (सुनील ताम्हणे) यांनी काम पाहिले