पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पे अँड पार्क धोरण महानगरपालिका वतीने राबविण्यात येत आहे सध्या कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बंद झाली ,नोकऱ्या गेल्या ,पगार कमी झाले, प्रत्येक नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत आहे अशातच महानगरपालिका वतीने शहरात पे अँड पार्क धोरण राबविण्यात येत असल्याने या धोरणा विरोधात महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक स्थायी समिती सदस्य राजू बनसोडे यांनी निषेध व्यक्त करीत आंदोलन केले. महापालिका भवनात आज ऑनलाईन स्थायी समिती सभा असताना राजू बनसोडे यांनी पे अँड पार्क धोरणाचा जाहीर निषेध असे लिहिलेले फलक परिधान करून महापालिका भवनात निषेध केला
Advertisement