शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
लसीकरण केंद्रावरील गोंधळ, नागरिकांचे हेलपाटे वाचणार कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी अ प्रभाग कार्यालयात किऑस्क मशीनद्वारे टोकन देण्याची यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. या मशीनमार्फत टोकन घेऊन लस मिळवणे नागरिकांसाठी सोयीचे होईल. लसीकरण केंद्रावरील गोंधळ, नागरिकांचे हेलपाटे वाचणार आहेत. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ प्रभाग अध्यक्षा शर्मिलाताई राजेंद्र बाबर यांनी केले आहे.
लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून देत असताना ऑनलाईन बुकिंग करणे व केंद्रावर उपस्थित राहून टोकन घेण्याची पध्दत होती. यामध्ये नागरिकांमध्ये गोंधळ व लसीकरण केंद्रावर सतत वाद ओढवत होते. ही परस्थिती विचारात
घेता महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी किऑस्क मशीनद्वारे टोकन उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा महानगरपालिकेच्या अ प्रभाग कार्यालयात देखील उपलब्ध आहे. प्रभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील, तसेच निगडी, आकुर्डी, प्राधिकरण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
प्रभाग कार्यालयातील किऑस्क मशीनमध्ये आपला मोबाइल क्रमांक, जन्म वर्ष, प्रथम अथवा द्वितीय लस याची नोंद नागरिकांना करावी लागेल. मोबाइल क्रमांकावर येणारा ओटीपी क्रमांक व माहिती नोंदविल्यानंतर मशीनव्दारे नागरिकांना छापील टोकन क्रमांक प्राप्त होईल. उपलब्ध डोस संख्येनुसार नागरिकांची निवड करून त्यांना संदेश पाठवून लसीकरणासाठी बोलविण्यात येणार आहे. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड दोन्ही लसींचा पहिला व दुसरा डोस नागरिकांना मिळू शकणार आहे, असे शर्मिलाताई बाबर यांनी सांगितेल आहे