शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.११ मार्च) :- गेले दोन वर्ष कोविड महामारीमुळे महिला घरात बंदिस्त होत्या, सर्व महिलांना दोन क्षण देखील विरंगुळयाचे या काळात मिळाले नसतील या गोष्टी लक्षात घेवून, प्रभाग क्र.35 मधील महिला भगिनींनसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक “आदर्श माता पुरस्कार” व सांस्कृतिक महिलांसाठी लावण्यांचा कार्यक्रम दि.10 मार्च 2022 ला दुपारी 11.30 वा. प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षगृह, चिंचवड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका मनिषा पवार म्हणाल्या, आपण सर्वांनी एकत्र येवून आनंदाचे दोन क्षण व्यतीत करावेत म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी प्रभागातील महिलांना “आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रभाग क्र.35 मधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मातांचा गौरव करण्यात आले. महिलांकडुन आमच्यासारख्या काम करणाऱ्या महिला व घरी असलेल्या महिलांना कुठेतरी मनमोकळे आनंद व्यक्त करण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळवुन दिली. सहभागी होऊन एक वेगळा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल नगरसेविका सौ. मनिषा प्रमोद पवार यांचे अनेक महिलांनी आभार व्यक्त केले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे, मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप,नगरसेविका सुजाताताई पालांडे, नगरसेविका शारदा ताई सोनवणे, काळूराम बारणे,नगरसेवक अभिषेक बारणे, तानाजी बारणे,स्वीकृत प्रभाग सदस्य संदीप गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.