खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील युवानेते आकाश चतुर्वेदी यांनी आज मुंबई येथील शिवसेना भवन येथे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला,
सामाजिक कामात अग्रेसर असणारे आकाश चतुर्वेदी हे मागील काही वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहरात उत्तमोत्तम सामाजिक उपक्रम राबवित आहेत, त्यांनी आपला राजकीय प्रवास शिवसेनेतून यानिमित्ताने सुरू केला आहे.
खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आकाश चतुर्वेदी यांना शिवबंधन बांधण्यात आले यावेळी, शिवसेना नेते , आमदार दुष्यंत चतुर्वेदी, रवींद्र मिर्लेकर बाळा कदम व शिवसेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख नगरसेवक सचिन भोसले उपस्थित होते.
आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आकाश चतुर्वेदी यांचे शिवसेनेत जाहीर प्रवेश झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेची नक्कीच ताकद वाढणार आहे, शिवसेना पक्षाला शहरात नवीन युवा कार्यकर्ते जोडण्यास आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आपण शिवसेनेचे विचार शहरभर पोहोचण्याचे काम करणार असल्याचे यावेळी आकाश चतुर्वेदी यांनी सांगितले.