पिंपरी : शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी एकाला अटक केली. बुधवारी (दि. १५) रात्री संभाजीनगर, चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली. रोहित बालाजी वाघमारे (२७, रा. हारंगुळ बुद्रुक, ता. जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक विपुल जाधव यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण शस्त्र घेऊन बर्ड व्हॅली हॉटेलच्या शेजारी संभाजीनगर चिंचवड येथे आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून रोहित याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २०० रुपये किमतीचा एक लोखंडी सत्तूर जप्त केला आहे.
previous post