पिंपरी : कंपनीच्या शेडमधून चोरट्यांनी तीन लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. १४) रात्री साडेआठ ते बुधवारी (दि. १५) सकाळी आठच्या कालावधीत प्रोराईट्स इन्क्युपमेंट्स प्रा. लि. शेल- रवस्ती, चिखली येथे घडली. चंद्रकांत पांडुरंग निकम (५३, रा. चन्होली बुद्रुक, ता. हवेली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. फिर्यादींची शेलारवस्ती येथे कंपनी आहे. कंपनीच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी रात्री वेगवेगळ्या आकाराचे पाईप, प्लांजेस, एल्बो आणि रेड्युसर चोरून नेले अधिक तपास पोलीस करत आहेत