शबनम न्यूज | शिरोली
कोल्हापूर | प्रतिनिधी
आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – 4 वर तावडे हॉटेल उड्डाणपुलापासून पुढे शिरोली गावाजवळ महामार्गावरील महापुराच्या पाण्याची पाहणी केली. तसेच पोलिसांनी व वाहनधारकांनी पूर्वेकडील महामार्गावर अवघे दीड फूट पाणी असल्याचे सांगितले असता त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी त्वरित जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. व तातडीने राष्ट्रीय महामार्गाची पूर्वेकडील बाजू सुरू करण्याच्या सूचना यावेळी हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
तसेच कोल्हापूरवरून मुंबईकडे जाणारी व कोल्हापूरकडे येणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी महामार्गावरील डिव्हायडर तातडीने तोडण्याच्या सूचना हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. व त्यानुसार तातडीने कार्यवाही झाली व पूर्वेकडील महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. यावेळी वाहनधारकांसह एनडीआरएफच्या जवानांशीही हसन मुश्रीफ यांनी संवाद साधला.